राज्य पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्षपदी विलास ताठे यांची नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने रावेर तालुका अध्यक्षपदी पत्रकार विलास ताठे तर रावेर शहर अध्यक्ष पदी विनोद कोळी यांची निवड करण्यात आल्याचे पत्र ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके यांनी आज दि. २१ ऑक्टोबर रोजी दिले आहे.
तसेच यावेळी रावेर तालुका कार्यकारणीतील तालुका उपाध्यक्ष संतोष नवले, कार्यध्यक्ष योगेश सैतवाल, सचिव दिलीप भारंबे, जगदीश वासुदेव चौधरी, सहसचिव जगदीश चौधरी व सदस्य सरदार पिंजारी, मनीष चव्हाण, हमीद तडवी, आनंदा भालेराव यांची देखील निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, सुनील भोळे, संतोष ढिवरे, भरत काळे, नरेश बागडे, रितेश माळी, दिपक सपकाळे, अभिजित पाटील, संजय तांबे, नाजनीन शेख, चेतन निंबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे, स्वप्नील सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp us whatsapp