पतीने डोक्यात लोखंडी रॉड मारून संपविली पत्नीची जीवनयात्रा

भिवंडी (वृत्तसंस्था) : येथील गायत्रीनगर येथे पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगलने हल्ला करून तिचा खून केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भिवंडी शहरातील गायत्रीनगर येथे राहणारी मयत लक्ष्मी रामरतन भारती (वय ३५ वर्ष) हिचा पती राम रतन सुखलाल भारती (वय ४० वर्ष) हा लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाला होता. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जात असताना तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून या पती-पत्नीमध्ये रोज भांडण होते. याच कारणामुळे रविवारी रात्री त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. त्यावेळी रामरतन याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगलने जोरदार प्रहार केला. यात जखमी झालेल्या पत्नीला इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पत्नी लक्ष्मी हिची मैत्रीण अफसाना अलताफ शेख (वय २४ वर्ष) हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी पती राम रतन सुखलाल भारती याला तात्काळ अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp us whatsapp